हैदराबाद : हल्ली रिक्षा-टॅक्सीला पर्याय म्हणून ओला-उबेर कॅबचा वापर वाढू लागलाय. चांगली तसेच किफायतशीर सेवा म्हणून या ओला-उबेरकडे पाहिले जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र ओला कॅबचा प्रवास हैदराबादमधील रतीश सेखर यांना चांगलाच महागात पडला. ओला कॅबमधून 450 किमीच्या प्रवासासाठी त्यांना तब्बल 9,15,887 रुपयांचे बिल आलेय.


डेक्कन क्रोनिकलच्या बातमीनुसार, एका खाजगी कंपनीत जॉब करणारे सेखर यांनी हैदराबादहून  निझामाबदच्या प्रवासासाठी ओला कॅब बुक केली. सकाळी 7.57 मिनिटांनी त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. संध्याकाळी 5.16 ते निझामाबादला पोहोचले. हा प्रवास 450 किमींचा होता.


यासाठी साधारणपणे 5 हजार रुपयांपर्यत खर्च अपेक्षित होता. मात्र त्यांना जेव्हा बिल दिले  गेले तेव्हा पाहून त्यांना धक्काच बसला. हे बिल तब्बल 9,15,887 रुपयांचे होते. दरम्यान, ओलाच्या कर्मचाऱ्यांनी याची दखल घेत त्या प्रवाशाची माफी मागितली आणि या प्रकऱणात लक्ष घालू असे आश्वासन दिले.