आता ओला देणार बीएमडब्ल्यूची सेवा
बीएमडब्ल्यूमधून फिरण्याचं अनेकांचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे.
मुंबई : बीएमडब्ल्यूमधून फिरण्याचं अनेकांचं स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. बीएमडब्ल्यू आणि ओलामध्ये झालेल्या करारामुळे हे शक्य होणार आहे. दिल्ली, मुंबई आणि बंगळूरुमध्ये या शहरांमध्ये या सेवेला सुरुवात होणार असून येत्या काही दिवसांमध्ये इतर शहरांमध्येही ओलाची बीएमडब्ल्यू धावताना दिसेल.
ओलाच्या लक्स कॅटॅगरीमध्ये ही बीएमडब्ल्यूची सेवा मिळणार आहे. लक्स कॅटेगरीचं कमीत कमी भाडं 250 रुपये आणि 20-22 रुपये प्रती किलोमिटर आहे. तसंच ग्राहकांना ताशी गाडीही बूक करता येणार आहे.