नवी दिल्ली : नोटबंदीबाबत आज संध्याकाळी सरकार मोठी घोषणा कऱण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 500 आणि 1000च्या नोटा वापरण्याची मुदत वाढवली जाण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नोटा वापरण्याची मुदत आज मध्यरात्रीपर्यंत आहे. मात्र ही मुदत वाढवून 30 नोव्हेंबरपर्यंत केली जाणार असल्याची शक्यता आहे. 


रुग्णालये, पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन्स तसेच एअरपोर्टवर 500 आणि 1000च्या नोटा वापरण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलीये. 


दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर आज मध्यरात्रीपर्यंत टोलमुक्ती आहे. त्यानंतर टोल भरावा लागणार आहे. तसेच घरपट्टी, पाणीपट्टी, वीजेचे बिल भरण्यासाठी जुन्या नोटा वापरण्याची मुदत आजपर्यंतच आहे.