तिरुअनंतपुरम : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओणमच्या पूर्वसंध्येला १३ सप्टेंबर रोजी अमित शहा यांनी वामन जयंतीचं ट्विट केलं. त्यावरून ओणम साजरा करणाऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केलीय. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी अमित शहा यांच्या ट्विटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केरळच्या जनतेसाठी हे ट्विट अपमानजनक असल्याचं म्हटलंय.


अमित शाह यांनी वामनाचा एक फोटो ट्विट केलाय ज्यात महाबलीच्या डोक्यावर पाय उभा ठेवून वामन उभा दिसतो. महाबलीला पौराणिक कथांमध्ये असुरांचा राजा मानलं जातं.  
 



उल्लेखनीय म्हणजे, आरएसएसची मल्याळम पत्रिका केसरीमध्ये नुकताच एक लेख प्रकाशित करण्यात आला होता. यात केलेल्या दाव्यानुसार, ओणम हा दिवस खरा म्हणजे वामन जयंती म्हणून साजरा केला जातो... (वामन हा विष्णूचा पाचवा अवतार मानला जातो). यावर सारवासारव कर केरळचे भाजप अध्यक्ष राजशेखरन यांनी पत्रिकेत छापलेले विचार लेखकाचे व्यक्तीगत विचार असल्याचं म्हटलं होतं. 


सोशल मीडियावर अमित शहांनी निर्माण केलेला हा वाद चांगलाच गाजतोय.