फैजाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी १००० आणि ५०० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय दिला आणि देशभरात खळबळ माजली. पण या निर्णयामुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे. 
 
मंगळवारी जेव्हा 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा बंद करण्याची बातमी आली तेव्हा हे ऐकूण उत्तर प्रदेशमधील फैजाबादमध्ये एका व्यापाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. फैजाबाद येथील डॉक्टर आनंद गुप्ता यांना एका रूग्णाचा फोन आला. 500 आणि 1000 च्या नोटा बंद केल्याचं एक वृत्त ऐकल्यापासून अस्वस्थ वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. पण रूग्ण डॉक्टरांकडे पोहोचण्यापुर्वी रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.


आपल्याकडे असलेल्या रोख रकमेचं काय करायचं अशी चिंता अनेकांना सतावते आहे. लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे.