नवी दिल्ली : बारामूलामध्ये आर्मी कँपवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. तर २ दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले आहे. दहशतवाद्यांचा मृतदेह अजून जवानांनी ताब्यात घेतलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार एक दहशतवादी झेलम नदीमध्ये उडी मारुन फरार झाला आहे. 


जवानांकडून अजून सर्च ऑपरेशन सुरु आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचं लष्कराकडून सांगण्यात येतंय.