नोटाबंदीनंतर काँग्रेसने विरोधकांना एकत्र आणले खरे पण... उभी फूट
नोटाबंदीनंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसनं विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला खरा. पण तो म्हणावा तितका यशस्वी होताना दिसत नाही. आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी दिल्लीत विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांची याच मुद्द्यावर रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावली आहे.
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीवरून सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसनं विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला खरा. पण तो म्हणावा तितका यशस्वी होताना दिसत नाही. आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी दिल्लीत विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांची याच मुद्द्यावर रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावली आहे.
मात्र, या बैठकीकडे ममता बॅनर्जी आणि लालूप्रसाद यादव सोडले, तर इतर महत्वाच्या विरोधीपक्षांनी पाठ फिरवली आहे. जे़डीयूचे नितीश कुमार, डावे पक्ष, आणि समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव बैठकीला येणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे.
मोदींविरोधात विरोधक एकवटले होते. मात्र, राहुल गांधी यांनी मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. परंतु अचनाक केवळ काँग्रेसचे शिष्टमंडळ घेऊन मोदींची भेट घेतली. या भेटीत त्यांना मोदींकडून ठोस आश्वासनही मिळालेले नाही. राहुल गांधी यांची ही कृती अन्य सहभागी पक्षांच्या नेत्यांना रुचलेली नाही. मोदी विरोधातील एकवटलेल्या पक्षांत फूट पडण्यास मदत झाली. त्यामुळे विरोधकाच्या एकजूटीचा प्रयत्न जवळपास फसल्यात जमा आहे, असेच दिसून येत आहे.