नवी दिल्ली  :  सैन्य दलात भरतीची इच्छा बाळगणाऱ्या तरूणांसाठी एक खुशखबर... १२ वी नंतर भारतीय सैन्य दल जॉइन करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय सैन्य दलात वेगवेगळ्या वर्गांच्या वेगवेगळ्या पदांसाठी भर्ती निघाली आहे. यात योग्यतेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. या पदांमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या योग्यता निर्धारित करण्यात आली आहे. तसेच निवड प्रक्रियाही वेगळी आहे. 


लष्कराने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार १०+२ टेक्निकल एन्ट्री स्किम कोर्स पदासाठी अर्ज मागविले आहे.



संस्थेचे नाव -  इंडियन आर्मी


1. पदाचे नाव- 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स पद - 38


अंतिम तारीख - 16 मे ते 14 जून 2017 पर्यंत अर्ज करू शकतात. 


शैक्षणिक योग्यता - कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेत रसायनशास्त्र आणि गणितात १२ वीत ७० टक्के मार्क असावे 


पदांची संख्या - 90


निवड प्रकिया - एसएसबी इंटरव्यू  आणि मेडिकल एग्जामिनेशनच्या आधारे निवड


मासिक पगार -  21,000 रुपये 



2. पदाचे नाव -  टेक्निकल ग्रॅजुएट कोर्स


पदांची संख्या-  40


वयोमर्यादा - न्यूनतम वय 20 वर्ष तर अधिकतम वय 27 वर्ष 



शैक्षणिक योग्यता- मान्यता प्राप्त संस्थेची इंजीनियरिंगची डिग्री


अंतिम तारीख- 14 जून, 2017


अर्ज प्रक्रिया-  कोर्समध्ये प्रवेस करण्यासाठी संबंधित वेबसाइटवर क्लिक करून  ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी अर्जाची प्रत आपल्याकडे काढून ठेवा 


 


3. पद- आर्मी एजुकेशनल कॉर्प्स कोर्स (एईसी-126)


एकूण पद- 12


वयोमर्यादा - उम्मीदवारांचे न्यूनतम वय 23 वर्ष किंवा अधिकतम वय 27 वर्ष 


शैक्षणिक योग्यता- मान्यताप्राप्त संस्थेतून  10वीं उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा.


अंतिम तारीख- 12 जून, 2017 


अर्ज प्रक्रिया-  कोर्समध्ये प्रवेस करण्यासाठी संबंधित वेबसाइटवर क्लिक करून  ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी अर्जाची प्रत आपल्याकडे काढून ठेवा 


कसा करणार अर्ज 
www.joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करा.