नोटबंदीच्या विरोधात विरोधी पक्ष पाळतोय काळा दिवस
नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आज राज्यसभेत पुन्हा एकदा गदारोळ सुरू झाला. राज्यसभेत विरोधीपक्ष नेते गुलामनबी आझाद यांनी सरकारवर टीका करत पंतप्रधानांनी राज्यसभेत उपस्थित राहून चर्चा ऐकावी अशी मागणी करण्यात आली. विरोधकांनी सकाळपासून आक्रमक पवित्रा घेतल्यानं गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी पक्षाचे खासदारानीही जोमानं प्रत्युत्तर देत गोंधळात भर घातली. अखेर सभापती हामीद अन्सारी यांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब करण्यात केलं.
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात आज राज्यसभेत पुन्हा एकदा गदारोळ सुरू झाला. राज्यसभेत विरोधीपक्ष नेते गुलामनबी आझाद यांनी सरकारवर टीका करत पंतप्रधानांनी राज्यसभेत उपस्थित राहून चर्चा ऐकावी अशी मागणी करण्यात आली. विरोधकांनी सकाळपासून आक्रमक पवित्रा घेतल्यानं गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी पक्षाचे खासदारानीही जोमानं प्रत्युत्तर देत गोंधळात भर घातली. अखेर सभापती हामीद अन्सारी यांनी राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब करण्यात केलं.
नोटाबंदीच्या निर्णयाच्या महिनापूर्तीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष काळा दिवस पाळतायत. या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी संसद भवन परिसरात धरणे आंदोलन केलं. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर विरोधक एकत्र आले आणि मोदींच्या नोटबंदी निर्णयाचा निषेध केला. विरोधकांच्या या आंदोलनात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, गुलाम नबी आझाद, जेडीयूचे शरद यादव, सपाचे रामगोपाल यादव, राजद नेता जयप्रकाश नारायण यादव उपस्थित होते. यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.