नोटबंदीबाबत मोदींना मागावी माफी...
नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेत सलग सोळाव्या दिवशी गोंधळाचं वातावरण आहे. विरोधक आणि सत्ताधा-यांच्या गोंधळामुळं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली.
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेत सलग सोळाव्या दिवशी गोंधळाचं वातावरण आहे. विरोधक आणि सत्ताधा-यांच्या गोंधळामुळं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली.
तर राज्यसभेत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी विरोधकांना चांगलचं धारेवर धरलं. विरोधक दररोज नको ती कारणं पुढं करून गोंधळ घालतात. त्यापेक्षा हिंमत असेल तर चर्चा करा असं आव्हानच जेटलींनी विरोधकांना दिलं.
महसूल सचिव हसमुख अढिया यांनी नोटाबंदीनंतर पाचशे आणि हजाराच्या सगळ्या नोटा परत बँकेत जमा होण्याची शक्यता वर्तवलीय. त्यामुळेही सरकारची अडचण झालीय. तर दुसरीकडं लोकसभेत सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. पण विरोधकांचा गोंधळ काही केल्या कमी होतं नव्हता.
लोकसभेत मतदानासह चर्चा करण्याची विरोधकांची मागणी होती. तर सरकार 193च्या नियमाअंतर्गत नोटाबंदीच्या निर्णयाची चर्चा करण्यास तयार आहे.