नवी दिल्ली : माजी सैनिक सुभेदार रामकिशन गरेवाल यांच्यावर भिवनीत अंत्यसंस्कार करण्यात  आले.  या अंत्यसंस्काराला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी उपस्थिती लावली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन रँक वन पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून गरेवाल यांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर देशातलं राजकारण चांगलंच गरम झालंय. भाजप, काँग्रेस आणि आप यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केलेत. या प्रकरणात राहूल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिलं होतं. 


रामकिशन गरेवाल यांच्या पार्थिवावर हरियाणातल्या भिवनी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल गांधींच्या या राजकारणावर भाजपनं जोरदार हल्लाबोल केला आहे.