नोटाबंदीनंतर देशभरातून 240 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिन्याभरापूर्वी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केली. नोटाबंदीनंतर अद्यापही बँका तसेच एटीएमबाहेरील रांगा काही कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिन्याभरापूर्वी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केली. नोटाबंदीनंतर अद्यापही बँका तसेच एटीएमबाहेरील रांगा काही कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत.
नोटाबंदीनंतर अनेक ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात 500 आणि 1000च्या नोटांचा साठाही जप्त करण्यात आला. इतकंच नव्हे तर नव्याने चलनात आलेल्या नोटांचा साठाही अनेक ठिकाणी जप्त करण्यात आल्याच्या घटना घडतायत.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, नोटाबंदीनंतर देशभरातून तब्बल 240 कोटीहून अधिक रकमेच्या(दोन हजार रुपयांच्या 85 हजाराहून अधिक नोटा) नव्या नोटा जप्त करण्यात आल्यात.
तसेच या कारवायांमध्ये अनेक बँक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले तर काहींची बदली करण्यात आली.