नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी, परदेशात संपत्ती लपवून ठेवल्याचा कार्तीवरील आरोप निराधार आणि पूर्णपणे खोटा असल्याचा दावा केला आहे, तो माझा मुलगा असल्यामुळेच त्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही पी. चिदंबरम यांनी केलंय.


दरम्यान, मुलाच्या माध्यमातून मलाच लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्तीने परदेशात संपत्ती लपविल्याच्या आरोपासंबंधी सरकारचा दृष्टिकोन ठाम असेल तर त्यांनी या संदर्भात एक यादी तयार करावी आणि अशा प्रकारची संपत्ती हस्तांतरित करण्यासाठी माझा मुलगा आवश्‍यक ती सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देईल, असेही चिदंबरम यांनी स्पष्ट केले. कार्ती चिदंबरम यांनी जगभरात बांधकाम क्षेत्रात मोठी गुंतवणूक केल्यासंबंधीच्या वृत्तांवर पी. चिदंबरम यांनी आपले म्हणणे मांडले.