`संघवाल्यांनी बिकनी घातली तरी फरक पडत नाही`
आरएसएसनं आपल्या युनिफॉर्ममध्ये बदल केला. खाकी हाफ पँटऐवजी आता संघाचे स्वयंसेवक तपकिरी रंगाची फूल पँट घालणार आहेत. यावरून विरोधकांनी संघावर टीका केली आहे.
नवी दिल्ली: आरएसएसनं आपल्या युनिफॉर्ममध्ये बदल केला. खाकी हाफ पँटऐवजी आता संघाचे स्वयंसेवक तपकिरी रंगाची फूल पँट घालणार आहेत. यावरून विरोधकांनी संघावर टीका केली आहे.
संघवाल्यांनी फूल पँट घातली की बिकनी घातली आम्हाला फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार आणि राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे अध्यक्ष पी.एल. पुनिया यांनी दिली आहे.
याआधी आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनीही या युनिफॉर्मवर टीका केली होती. त्यांना पुन्हा हाफ पँटमध्ये पाठवू असा टोला लालूंनी हाणला होता, तर बच्चे बडे हो रहे है असं ओवेसी म्हणाले होते.