नवी दिल्ली : पद्म पुरस्कारासाठी आता तुम्ही आम्हीसुद्धा एखाद्या व्यक्तीच्या नावाची शिफारस करु शकता. पद्म पुरस्कार निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पद्म पुरस्कारांत लॉबिंग होत असल्याचा आरोप अनेकदा होता. कर्तृत्व नसलेल्या मंडळींनाहा हा पुरस्कार दिल्याचाही आरोप झाला होता. याच पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया खुली करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. 


देशातील कुणीही एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीचं पद्म पुरस्कारासाठी नाव सुचवं शकते. ऑनलाईन पद्धतीने हे नामनिर्देशन करता येणार आहे. शिफारस करणाऱ्या व्यक्तीला आपला आधार कार्ड नंबर द्यावा लागणार आहे. त्यावरुन त्याची सत्य असत्यता पडताळून पाहता येऊ शकेल.


सरकारच्या निर्णयामुळं प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणा-या व्यक्तींचा योग्य सन्मान होऊ शकणार आहे. खुल्या शिफारस प्रक्रियेअंतर्गत नामनिर्देशन करण्यासाठी 15 सप्टेंबरही ही अखेरची मुदत आहे.