मुंबई : देशाची कमान खऱ्या अर्थाने ही अधिकाऱ्यांच्या हातात असते. जर कर्मचारीवर्ग जेव्हा सुधारतो तेव्हा कायदे व्यवस्था देखील सुधारते. देशात आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडणारे अनेक अधिकारी आहेत. अशाच एका अधिकाऱ्याची ओळख आम्ही तुम्हाला करुन देत आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनएसए अजीत डोवाल यांची कहाणी


१. उत्तराखंडमधील पौडी गढवालमध्ये 20 जानेवारी 1945 मध्ये  अजीत डोवाल यांचा जन्म झाला होता. त्यांचे पिता हे लष्करात होते.


२. अजमेर मिलिट्री स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर आग्रा यूनिवर्सिटीमधून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पदव्यूत्तरपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं.


३. 1968 केरळ बॅचचे ते IPS ऑफिसर अजीत डोवाल यांची नियुक्ती झाल्यानंतर ४ वर्षांनी म्हणजेच १९७२ मध्ये इंटेलीजेंस ब्यूरोशी जोडले गेले. पोलीस सेवेत असतांना देखील त्यांनी अनेक मोठी कामगिरी केली होती.


४.अजीत डोवाल यांनी अधिक वेळ गुप्तचर यंत्रणांमध्येच घालवला. ते ६ वर्ष पाकिस्तानात एक गुप्तहेर म्हणून राहत होते.


५. 2005 मध्ये एक अतिशय तेजस्वी गुप्तचर विभागातील अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. अजीत डोभाल इंटेलीजेंस ब्यूरोच्या डायरेक्टर पदावरुन रिटायर झाले.


६. 2009 मध्ये अजीत डोवाल विवेकानंद इंटरनेशनल फाउंडेशनचे फाउंडर प्रेसिडेंट बनले. या दरम्यान न्यूज पेपरमध्ये लिहिणं देखील त्यांनी सुरु केलं. 1989 मध्ये अजीत डोवालने यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील फुटीरतावाद्यांना बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 'आपरेशन ब्लॅक थंडरटचं त्यांनी नेतृत्व केलं होतं.


७. पंजाब पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा गार्डसोबत मिळून डोवाल यांनी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची भूमिका बजावली होती.


८. अजीत डोवाल 1999 मध्ये कंधारमध्ये गेले. इंडियन एयरलाइंसचं विमान आईसी 814 च्या अपहरणकर्त्यांसोबत चर्चेत त्यांनी मुख्य भूमिका बजावली होती.


९. जम्मू-कश्मीरमध्ये घुसखोरी विरोधात आणि शांतीसाठी कायम करण्यासाठी काम केलं तेव्हा अनेक दहशतवाद्यांनी सरेंडर केलं होतं.


१०. अजीत डोभाल 33 वर्ष नॉर्थ-ईस्ट, जम्मू-कश्मीर आणि पंजाबमध्ये गुप्तचर खात्याचे हेर होते.


११. ३० मे २०१४ मध्ये डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ५ वे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त झाले.


१२. डोवाल हे पंतप्रधान मोदी यांच्या जवळचे मानले जातात. पाकिस्तान देखील त्यांच्यातील क्षमतेमुळे कापतं. 


१३. १९८८ मध्ये डोवाल यांना जवानांना दिलं जाणाऱ्या किर्ती चक्राने सन्मानित केलं गेलं जे पहिल्यांदाच एका पोलीस अधिकाऱ्याला मिळालं होतं.