नवी दिल्ली : रविवारी जम्मू-काश्मीरच्या उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताने याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या या भूमिकेचा पाकिस्तानने धसका घेतला असून त्यांनी सीमेवरच्या जवानांची सुट्टी रद्द केलीये. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार लष्करातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहोरस्थित पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयातून सीमेवर तैनात जवानांच्या सुट्ट्या रद्द कऱण्याचे आदेश दिलेत. तसेच जे पोस्टिंग रिक्त होते तेथेही नियुक्ती करण्यात येणार असल्याचे समजते.


इतकंच नव्हे तर विंग कमांडर्सनाही आदेश देण्यात आलेत की रात्रीच्या वेळीदेखील पोस्टींग असलेल्या ठिकाणी उपस्थित रहावे. दरम्यान, उरी हल्ल्यानंतर भारताकडूनही सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आलीये.