अहमदाबाद : उरी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईनंतर दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढलाय. एकीकडे भारतातील सीमेनजीकच्या गावातील लोकांचे स्थलांतर करण्यात आलेय तर दुसरीकडे सीमेवरच्या हालचालीही वाढल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचदरम्यान गुजरातच्या पोरबंदरमध्ये कोस्टगार्डने एक पाकिस्तानी बोट ताब्यात घेतलीये. तसेच बोटमधील 9 जणांनाही ताब्यात घेण्यात आलंय. 


समुद्रात ही बोट नजरेस पडल्यानंतर कोस्ट गार्डने बोट आणि बोटीतील 9 जणांन ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले हे सर्वजण मच्छिमार असल्याचे समजतेय. अधिक चौकशी सुरु आहे.