पंजाबच्या जेल हल्ल्यात खलिस्तानी अतिरेकी फरार
पंजाबच्या पटियालामधील नाभा जेलवर झालेल्या हल्ल्यामध्ये खलिस्तानी लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हरमिंदर सिंग मिंटू आणि पाच कैदी फरार झाले आहेत.
पटियाला : पंजाबच्या पटियालामधील नाभा जेलवर झालेल्या हल्ल्यामध्ये खलिस्तानी लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हरमिंदर सिंग मिंटू आणि पाच कैदी फरार झाले आहेत. हरमिंदर सिंग, गुरप्रीत सिंग, विकी गोंदरा, नितीन देओल आणि विक्रमजीत सिंग अशी या फरार झालेल्या कैद्यांची नावं आहेत.
सकाळी नाभा जेलवर पोलिसांच्या वेशात आलेल्या पाच हल्लेखोरांनी हल्ला केला. या हल्लेखोरांकडे अत्याधुनिक शस्त्र ज्यातून त्यांनी 100 राऊंड फायर केल्या. यानंतर हे हल्लेखोर तीन चारचाकींमधून पाच कैद्यांना घेऊन पसार झाले.
दरम्यान भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानकडून हा हल्ला करण्यात आला असू शकतो, असा संशय पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी व्यक्त केला आहे.