नवी दिल्ली :  पाकिस्तान संदर्भात भारताची कूटनिती यशस्वी होताना दिसत आहे. भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांच्या वक्तव्यावरून हे दिसून येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडियाच्या सूत्रांच्या हवाल्याने भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, कश्मिरी नागरिकांना भारतासोबत राहायचे असेल तर त्यांनी राहावे, युद्ध कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही. 


उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जागतिक स्तरावर आपले भूमिका कठोर केली. यूएन महासभामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काश्मिरचा मुद्दा उपस्थित करून आपल्या तोंडावर पडले आहेत. त्यानंतर पाकिस्तानचा बचावात्मक पवित्रा घेतला आहे. 


 हाफिस सईद आणि सैय्यद सलाउद्दीन यांना भारताविरोधात विष ओकण्याची परवानगी पाकिस्तान का देते, या प्रश्नावर बासित म्हणाले, असे आवाज भारतासुद्धा उठतात. पाकिस्तान किंवा भारताची नीती यावरून ठरत नाही. 


अब्दुल बासित म्हणाले की, दोन्ही देशातील संवादात युद्धाची भावना वरचढ व्हायला नको, जम्मू काश्मीरमधील जनतेला आपले भविष्य ठरविण्याची संधी दिली पाहिजे. त्यांना वाटते की ते भारतात जास्त खूश आहेत तर त्यांना भारतात ठेवले पाहिजे.