उरी हल्ल्यानंतर सीमेवर पाकिस्तानचा आणखी एक डर्टी प्लॅन
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे गुप्तचर गुप्त सूचना एकत्र करण्यात लागले आहेत. त्यांनी सीमावर्ती भागातील नागरिकांना सोशल मीडिया किंवा हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांना अलर्ट केले आहे.
नवी दिल्ली : उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे गुप्तचर गुप्त सूचना एकत्र करण्यात लागले आहेत. त्यांनी सीमावर्ती भागातील नागरिकांना सोशल मीडिया किंवा हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांना अलर्ट केले आहे.
राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात प्रशासन सभा घेऊन लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रशासन संभावित कटांची शक्यता लक्षात घेऊन लोकांना सतर्क करीत आहेत.
संशयास्पद फोन कॉल, एसएमएस, व्हॉट्सअॅप मेसेज आणि फेसबूक पोस्टसंदर्भाात सावधानता बाळगण्यास सांगितले आहे.
पाकिस्तानची ही चालही असू शकते..
एका अधिकाऱ्याने सांगितले की पाकिस्तान शक्य ते प्रयत्न करू शकतो. सीमावर्ती भागातील तरूणांना हनी ट्रॅपमध्ये म्हणजे तरूणीचा वापर तरूणांना फितविण्यासाठी केला जाऊ शकतो.