पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, गोळीबारात महिलेचा मृत्यू
पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्ताने गोळीबार केला. यात एका महिलेचा मृत्यू झाला.
श्रीनगर : पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्ताने गोळीबार केला. यात एका महिलेचा मृत्यू झाला.
काश्मीरमधील नौशेरा आणि राजौरी सेक्टरमध्ये गुरूवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार पहाटे ३.३८ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाल्याची माहिती समोर आली. या गोळीबार एका महिलेचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे.
पाकिस्तानी सैन्याने काल रात्री १०.४० पासून स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबाराला सुरूवात केली. सध्यादेखील दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरुच आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली.