श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील मछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. या जवानाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाण्यासाठी मदत म्हणून पाकिस्तानी लष्करानं भारताच्या हद्दीमध्ये गोळीबार केला, पण भारतीय लष्करानं मात्र या दहशतवाद्याला ठार केलं आहे.


उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मिरात सर्जिकल स्ट्राइक करत जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. भारतानकडून करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत पाकिस्तानचे 15 जवान ठार करण्यात आलेत, अशी माहिती बीएसएफने दिली आहे.