पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेय.
श्रीनगर : पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलेय.
रविवारी सकाळी राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधील भारतीय सैन्याच्या चौक्यांवर गोळीबार केला. सकाळी पाच वाजता हा गोळीबार कऱण्यात आला.
पाकिस्तानी सैन्याकडून स्वयंचलित शस्त्रे तसेच तोफगोळ्यांचा वापरही करण्यात आला. भारतीय जवानांनीही या गोळीबारास तितकेच चोख प्रत्युत्तर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या गोळीबारात कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. त्यानंतरही अनेकदा पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन कऱण्यात आले.