गुजरातनंतर पंजाबमधूनही पाकिस्तानी बोट ताब्यात
पंजाबमध्ये बीएसएफच्या पथकानं भारताच्या हद्दीत शिरलेली एक पाकिस्तानी बोट ताब्यात घेतलीय.
अमृतसर : पंजाबमध्ये बीएसएफच्या पथकानं भारताच्या हद्दीत शिरलेली एक पाकिस्तानी बोट ताब्यात घेतलीय.
अमृतसर जिल्ह्यात रावी नदीत भारताच्या हद्दीत ही बोट आढळून आली. दोन दिवसांपूर्वीच गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर पाकिस्तानी बोट ताब्यात घेण्यात आली होती. त्यापार्श्वभूमीवर बीएसएफनं ही कारवाई केली.
मात्र, या बोटीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याचं बीएसएफचे महासंचालक के के शर्मा यांनी सांगितलंय.
सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचं वातावरण आहे. त्यामुळं भारतीय सीमेजवळच्या सर्व परिसरांमध्ये सतर्कता बाळगण्यात येत आहे.