नवी दिल्ली : मोदी सरकार एका पाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहे. आता मोठी बातमी अशी येत आहे की, पॅन कार्ड नसेल तर तुम्ही सोनं नाही खरेदी करु शकणार. सर्व सराफा व्यापाऱ्यांना सूचना पाठवण्यात आल्या आहेत की, सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांची माहिती ठेवा. सोने खरेदी करतांना तुम्हाला तुमचं पॅनकार्ड दाखवणं अनिवार्य असणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


बुधवारी ५०० आणि १००० च्या नोटा सरकारने रद्द केल्या. त्यानंतर सोने खरेदी करणाऱ्यांची मोठी संख्या वाढली. यामुळेच सोन्यांने मोठी उसळी घेतली. सोनं ४ हजार रुपयांनी वाढलं.