पॅनकार्डला आधारशी जोडणं बंधनकारक, अन्यथा पॅनकार्ड ठरेल अवैध
पॅन कार्डसाठी आधार कार्ड आवश्यक
नवी दिल्ली : जर तुमचा परमनंट अकाउंट नंबर (PAN)ला आधार कार्डसोबत नाही जोडला तर तो ३१ डिसेंबरनंतर अवैध ठरणार आहे. इनकम टॅक्स रिटर्न आणि पॅनसाठी आधार कार्ड आता अनिवार्य करण्यात आलं आहे. सरकारच्या या निर्णयानंतर आर्थिक देवाण-घेवाणसाठी आता हा नंबर असणं आवश्यक असणार आहे.
सरकार संपूर्ण फायनँशल सेक्टरमध्ये आधार कार्डवर आधारित नो योर कस्टमर (KYC)ला जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटलं की, सरकार रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI)सहीत सर्व रेग्युलेटर्स सोबत चर्चा करत आहे. आधार KYC लगेचच एक इलेक्ट्रॉनिक आणि मजबूत प्रमाण उपलब्ध करतं. ज्यामुळे सेवा उद्योगाची प्रक्रिया अजून चांगली होण्यास मदत होईल.
१ जुलैपासून आयटी रिटर्नसाठी आधार आवश्यक
सरकारने फाइनान्स बिलमध्ये एक संशोधन करत इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आणि पॅन कार्डसाठी अर्ज करतांना आधार कार्ड बंधनकारक केलं आहे. अधिकाऱ्यांनी म्हटलं की, ज्या लोकांकडे आधार कार्ड असेल पण तरीही त्यांना कोणत्याही वित्तीय मध्यस्थ (फायनँशल इंटरमीडियरी) मध्ये जाऊन त्यांचा अंगठ्याचं निशान द्यावं लागणार आहे.
एकापेक्षा अधिक PAN कार्ड ठेवणाऱ्यांवर आयकर विभागाची नजर आहे. अर्थमंत्री अरुण जेटलींनी म्हटलं होतं की, देशात ९८ टक्के म्हणजेच १०८ कोटी जनतेचं आधार कार्ड बनलं आहे. त्यामुळे सरकार याचा वापर वाढवणार आहे. इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी आणि पॅन कार्डसाठी आधारकार्ड अनिवार्य केलं आहे.
तुम्हाला काय करायचं आहे ?
incometaxindiaefiling.gov.in वर यासंबंधित माहिती तुम्ही मिळवू शकता. विशिष्ट ओळख पटवण्यासाठी लॉग इन करावं लागेल. तुमचं आधार कार्ड नंबर दिलेल्या जागेवर भरावा लागेल. त्यानंतर तुमची वैयक्तीक माहिती पॅनकार्डच्या माहितीसोबत जुळते का हे पाहिलं जाईल. त्यानंतर‘लिंक नाऊ’वर क्लिक करा. पॅन आणि आधारची माहिती जुळल्यानंतर ते एकमेकांना जोडलं जाईल.