पानीपत : देशात धार्मिक वातावरण ढवळून निघालं असताना एका अवलियानं आपल्या रक्तानं गीता आणि कुराण लिहून काढलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंडित कर्मवीर कौशिक असं या अवलियाचं नाव आहे. हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील निंदाना गावाचा तो रहिवासी... 


देशाला एकाच धाग्यात बांधून ठेवण्यासाठी आपण हिंदूंचा पवित्र ग्रंथ गीता आणि मुस्लिम बांधवांचा पवित्र कुराण लिहून काढल्याचं कौशिक म्हणतो. १८६ पानांची गीता लिहिण्यासाठी त्याला ३ वर्ष लागली तर ३६९ पानांचं कुराण-ए-शरीफ लिहिण्यासाठी ७ वर्ष... 


बोटांमध्ये सुई टोचून आपल्या रक्तात मोरपंख बुडवून त्यानं हे दोन्ही ग्रंथ लिहिलेत. 


उल्लेखनीय म्हणजे, हे दोन्ही ग्रंथ विकण्यासाठी पंडित कर्मवीरला हरिद्वारमध्ये एका इंग्रज व्यक्तीनं ५ करोड रुपयांची ऑफरही दिली होती... पण, हे ग्रंथ विकण्यास त्यानं नकार दिला.