...तर इथही दुसरी `भोपाळ दुर्घटना` घडली असती
केरळच्या एर्नाकुलममध्ये दुसरं `भोपाळ दुर्घटना` होता होता राहिलीय... इथं अमोनिया गॅसच्या गळतीमुळे लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. सगळ्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता.
तिरुअनंतपुरम : केरळच्या एर्नाकुलममध्ये दुसरं 'भोपाळ दुर्घटना' होता होता राहिलीय... इथं अमोनिया गॅसच्या गळतीमुळे लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. सगळ्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता.
जवळपास २ किलोमीटरपर्यंत हा वायू पसरला होता. त्यामुळे या परिसरातील लोकांना याचा त्रास जाणवायला सुरुवात झाली.
मालवाहू जहाज अमोनिया घेऊन जात असताना हा प्रकार घडला. एका टँकरचा वॉल्व तुटल्यामुळे गॅस गळती सुरू होती. या जहाजात गॅसचे सहा टँकर होते. हा गॅस फर्टिलाइजर्स अॅऩ्ड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड, कोच्चीला नेण्यात येत होता.
यामुळे जवळपासच्या लोकांना डोळ्यांची जळजळ आणि डोकेदुखीची तक्रार जाणवू लागली. स्थानिकांना आणि त्यांच्या जनावरांना लगेचच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. पाच जण एर्नाकुलम जनरल हॉस्पीटलमध्ये भरती आहेत.