चेन्नई : तामिळनाडु मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री ओ. पनिरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या निधनानंतर मध्यरात्रीच दी़ड  वाजता हा शपथविधी पार पडला. यावेळी ओ. पनिरसेल्वम भावूक झाले होते. त्यांच्याबरोबर 31 मंत्र्यांनीही शपथ घेतली. जयललितांवर उपचार सुरु असताना त्यांच्या अनुपस्थिीत त्यांचे विश्वासू सहकारी पनिरसेल्वम हेच सरकारचा कारभार पहात होते.


शपथविधीच्या आधी चैन्नईत AIADMK च्या मुख्यालयात रात्री बाराच्या दरम्यान आमदारांची बैठक झाली. ओ. पनीरसेल्वम यांनी बैठकीत मार्गदर्शन केलं. पक्षाचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर काही वेळानं शपथविधी पार पडला.