बंगळुरू : एकीकडे रेल्वे स्टेशनपासून सर्वत्र दिव्यांगांना सुविधा पुरवत असल्याचा दावा सरकारी जाहिराती करत असताना त्यांना प्रत्यक्षात कशी वागणूक दिली जाते, याचं लाजीरवाणं उदाहरण समोर आलंय... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एशियन पॅरा-सायकलिंगमध्ये रौप्यपदक पटकावणारा खेळाडू आदित्य मेहता याला बंगळुरू विमानतळावर अपमानकारक वागणूक मिळालीये. सुरक्षा रक्षकांनी त्याला कृत्रिम पाय काढून दाखवायला लावलाय, तसंच पूर्ण कपडे काढून त्याची तपासणी करण्यात आलीये... 


त्यानं पंतप्रधान कार्यालय, नागरी वाहतूक मंत्रालयाला पत्र पाठवून याचा निषेध केलाय. आपल्या देशात विमानतळांवर बॉडी स्कॅनर बसवण्यात आले, तर दिव्यांग व्यक्तीला अशा प्रकारांना सामोरं जावं लागणार नाही, अशी त्याची मागणी आहे. 


त्याचा पत्राला पंतप्रधान कार्यालयानं दिलेल्या उत्तरात ते संबंधित मंत्रालयाला पाठवण्यात आल्याचं म्हटलंय. तर दिव्यांग व्यक्तींबाबत अशा तपासणीमध्ये अधिक संवेदनशीलता दाखवण्याची गरज असल्याचं रिओ पॅरालिम्पिक पदकविजेती दीपा मलिक हिनं म्हटलंय...