नवी दिल्ली : आता हृदय हेलावणारी एक बातमी. दहा वर्षांच्या आतील दोन मुलींना वाऱ्यावर सोडून आई-वडील निघून गेलेत. ते एवढ्यावर न थांबता त्यांना घरात कोंडून ठेवले. त्यांचा जीव अन्नासाठी तडफडत होता. लहान असल्याने त्यांना उपाशीच दिवस काढावे लागले. कुपोषण झाले. त्यांच्या शरीरात जखमा झाल्यात. त्यात किडे पडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील एका घरामध्ये तीन आणि आठ वर्षांच्या दोन बहिणी जखमी आणि कुपोषण झालेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांची आई दोन महिन्यांपूर्वीच सोडून गेली, तर वडील मद्यपी आहेत. ते 15 ऑगस्टपासून गायब आहेत. अखेर 19 तारखेला शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि काळीज हेलावणारं दृष्य त्यांना दिसले. त्यांच्या अंगावर जागोजागी जखमा झाल्या होत्या. त्यात किडे झाले होते. त्या जवळजवळ गतप्राण झाल्या होत्या.


पोलिसांनी तातडीने दोघींना रुग्णालयात हलवले. मात्र त्यांच्या आई-वडिलांचा अद्याप पत्ता नाही. त्यांच्या आजीने त्यांना स्वीकारायला नकार दिला आहे. त्यामुळे उपचारानंतर चाईल्ड वेलफेअर कमिटीमध्ये त्यांची सोय करण्यात येणार आहे. पोटच्या मुलींना मरण्यासाठी सोडून गेलेल्या पाषाणहृदयी आई-बापाचा पोलीस शोध घेत आहेत.