दिल्लीत भाजप खासदार परेश रावल यांना दंड
सम-विषम नियमाचं उल्लंघन केल्यामुळे, भाजपचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांना दंड भरावा लागला आहे.
नवी दिल्ली : सम-विषम नियमाचं उल्लंघन केल्यामुळे, भाजपचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांना दंड भरावा लागला आहे.
परेश रावल यांनी नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची माफी मागत ही गंभीर चूक असल्याचंही म्हटलं आहे.
अरविंदजी आणि दिल्लीकरांची माफी मागतो असं ट्विट परेश रावल यांनी केलं आहे.
सोमवारी परेश रावल वैयक्तिक कारने संसदेत पोहोचले होते. पण सोमवारी रस्त्यावर फक्त विषम क्रमांकाच्या गाड्यांना परवानगी असताना, परेश रावल यांनी सम क्रमांकाच्या गाडीचा वापर केला होता, यावरून परेश रावल यांना दंड आकारण्यात आला.
संसदेत पोहोचण्यासाठी खासदारांना खास डीटीसी बस सेवेची सुविधा देण्याची घोषणा दिल्ली सरकारने केली आहे. संसदेचं अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे.