नवी दिल्ली : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आधीच हे अधिवेशन बोलवण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपतींचं अभिभाषण, आर्थिक पाहणीचा अहवाल, केंद्रीय अर्थसंकल्प या महत्वाच्या प्रक्रीया पहिल्या दोन दिवसातच आटोपल्या जाणार आहेत. उरलेल्या सहा दिवसात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्ताव पारित करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असेल. 


अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांवर तृणमुल काँग्रेसनं बहिष्कार घालण्याचं ठरवलंय. नोटाबंदी आणि विधानसभा निवडणुकांना प्रभावीत करु पाहणा-या अर्थसंकल्पावरुन आक्रमक होऊन विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षिय बैठकीकडे शिवसेनेनं पाठ फिरवली. तर लोकसभा अध्यक्ष सुमीत्रा महाजन यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते.