मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी आठ वाजल्यापासून पाच राज्यातील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये सत्ता कुणाची याचा फैसला होणार आहे. 


निकाल पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा


LIVE उत्तरप्रदेश निवडणूक 2017 निकाल


LIVE पंजाब निवडणूक 2017 निकाल


LIVE गोवा निवडणूक 2017 निकाल


 


LIVE मणिपूर निवडणूक 2017 निकाल


LIVE उत्तराखंड निवडणूक 2017 निकाल


 


>>> पंजाबमधील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं केलं अभिनंदन...


>>> बसपच्या पराभवासाठी ईव्हीएमना जबाबदार धरण्याचा मायावतींचा आरोप ऐकून वाईट वाटलं... मतदारांचा मूड बदलतोय, या वास्तवाचा स्वीकार करण्याची गरज - योगेंद्र यादव


>>> मणिपूरः भाजप आणि काँग्रेसची बरोबरी... १३-१३ जागा जिंकून काँटे की टक्कर.


>>> गोवाः भाजप - काँग्रेस ८-८ जागांवर विजयी... राष्ट्रवादी आणि मगोपाला प्रत्येकी एक जागा...


>>> उत्तर प्रदेशचा निकाल रद्दबातल करून नव्याने मतदान घ्या; मायावतींची निवडणूक आयोगाकडे मागणी


>>> थोडे जरी प्रामाणिक असाल, तुमच्यात हिंमत असेल तर जुन्या पद्धतीने - बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र द्या; मायावतींचं भाजप नेत्यांना आव्हान


>>> कोणतंही बटण दाबलं तरी भाजपला मत गेलं - मायावती


>>> मुस्लिमबहुल भागातही भाजपला मतं कशी मिळाली?; बसप नेत्या मायावतींचा सवाल...


>>> उत्तर प्रदेशातील बसपाच्या पराभवासाठी ईव्हीएम मशीन जबाबदार... ईव्हीएम मशीनशी छेडछाड करून भाजपचा विजय... मायावतींचा आरोप


>>> मणिपूरमध्ये काँग्रेस - भाजपमध्ये चुरस... दोन्ही पक्ष १०-१० जागांवर पुढे...रावत...


>>> उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत किच्छा मतदारसंघातही पराभूत.. अवघ्या ९२ मतांनी हरले रावत...


>>> उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत पराभूत... १० हजाराहून अधिक मतांनी पराभव... भाजपची मात्र स्पष्ट बहुमताकडे घोडदौड...


>>> मणिपूरमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत, सध्या 41 जागांवरील कलांमध्ये भाजपा 17 आणि काँग्रेस 17 जागांवर आघाडीवर, तर इतर 7 जागांवर आघाडीवर


>>>पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीतील रोड शोचा भाजपला मोठा फायदा... वाराणसीतील आठ जागांवर भाजप उमेदवार पुढे...


>>>गोव्यात  काँग्रेस १४, भाजप १०, एमजीपी ३, गोवा सुरक्षा मंच १, गोवा फ्रंट आप २, अपक्ष १ जागांवर आघाडीवर 


>>काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठी मतदारसंघात भाजपच्या गरिमासिंह पुढे... काँग्रेसच्या अमिता सिंह पिछाडीवर...


>>मणिपूरचा पहिला निकालः आयर्न लेडी इरोम शर्मिला यांचा पराभव... मुख्यमंत्री इबोबी सिंह विजयी....


>> अमृतसर पूर्वमधून नवज्योत सिंग सिद्धू आघाडीवर..


 



>>> अमृतसर पूर्वमधून नवज्योत सिंग सिद्धू आघाडीवर..


>>>पंजाब :  काँग्रेस - ५१, अकाली-भाजप - २७, आप - २४, इतर - १


>>उत्तर प्रदेशात दलित किंवा ओबीसी समाजातील मुख्यमंत्री द्यावा; साक्षी महाराजांचं मत


>>>अखिलेश यादव यांनी पराभव आधीच स्वीकारला होता... आता उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश बनवणं हे भाजपचं कर्तव्यः साक्षी महाराज


>> यूपीतील कल पाहता भाजपला स्पष्ट बहुमत... लखनऊमध्ये भाजप उमेदवारांचा जल्लोष...


> उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री हरीश रावत हरिद्वार ग्रामीण मतदारसंघातून आघाडीवर...


>> उत्तर प्रदेशः ३०० जागांचे कल हाती... भाजप २०४, सपा-काँग्रेस ५३ , बसपा ३१ इतर ११ जागांवर पुढे...


>>> उत्तर प्रदेशः १७० जागांचे कल हाती... भाजप १०४, सपा-काँग्रेस ३७ आणि बसपा २३ जागांवर पुढे...


>>> उत्तराखंडमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये घासून लढत... दोघेही १० जागांवर पुढे...


>>> उत्तर प्रदेशः सपाचे नेते मुलायमसिंह यादव यांची सून अपर्णा यादव पिछाडीवर...


>>> पंजाबः अकाली दल-भाजप तीन जागांवर पुढे... काँग्रेस आणि आप ५-५ जागांवर आघाडीवर...


>>> उत्तर प्रदेशात आझम खान (रामपूर) आणि गायत्री प्रजापती (अमेठी) आघाडीवर...


>>> पंजाबः काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग ३५०० मतांनी आघाडीवर...


>>> यूपीत सुरुवातीच्या कलामध्ये भाजपला मोठी आघाडी...


>>> पंजाबः आम आदमी पार्टीचे 'स्टार' उमेदवार भगवंत मान आघाडीवर...


>>> नोएडात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव भाजप उमेदवार पंकज सिंह दुसऱ्या फेरीनंतर ३ हजार मतांनी पुढे...


>>> लखनऊमधील पाचही जागांवर भाजप पुढे


>>> गोव्यात तीन जागांचे कल हाती... काँग्रेस दोन जागांवर पुढे...


>>> मणिपूरः इरोम शर्मिला पिछाडीवर... इबोबी सिंह यांना आघाडी...


>>> उत्तर प्रदेशः ६९ जागांच्या सुरुवातीच्या कलामध्ये भाजप ३८ जागांवर पुढे... सपा-काँग्रेस आघाडीला १८ जागांवर आघाडी... बसप ९ जागांवर पुढे..


>>> उत्तराखंडमध्ये पहिला कल भाजपच्या बाजूने... भाजप एका जागेवर पुढे...


>>> रामपूरमध्ये समाजवादी पार्टीचे आझम खान पिछाडीवर...


>>> उत्तर प्रदेशात ५९ जागांचे कल हाती... भाजप २५, सपा-काँग्रेस १८ आणि बसपा १४ जागांवर पुढे...


>>> पंजाबमधील कल काँग्रेसच्या बाजूने... १४ पैकी १० जागांवर काँग्रेस पुढे... अकाली दल-भाजप २ जागांवर, तर आप २ जागांवर आघाडीवर...


>>> पंजाबमध्ये तीन जागांचे कल हाती... तीनही जागांवर काँग्रेस आघाडीवर...


>>> उत्तर प्रदेशात १३ जागांचे कल हाती... सपा-काँग्रेस आघाडी, भाजप आणि बसपा ४-४ जागांवर पुढे...


>>> उत्तर प्रदेशात भाजपला दोन तृतियांश बहुमत मिळेल... सपा, बसपाचा सफाया होईल; भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मोर्य यांचा विश्वास


>>> उत्तर प्रदेशातील पहिला कल बसपाला... बाहुबली नेते मुख्तार अन्सारी आघाडीवर...


- पंजाबच्या ११७ जागांसाठी ५४ मतदान केंद्रांवर मतमोजणी सुरू...


उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, गोवा आणि मणीपुरमध्ये भाजपचं सरकार येणार असल्याचा कौल विविध एक्झिट पोलनी दिलाय. तर मात्र पंजाबमध्ये प्रस्थापितांविरोधी लाट जोरात असल्याचं दिसंतय. 


त्यामुळं काँग्रेस मुसंडी मारणार असून अकाली दल आणि भाजपचं पानीपत होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळं निकालसुद्धा एक्झिट पोलनुसारच समोर येणार का? याची उत्सुकता लागलीय. 


'झी 24 तास'वरही या निकालाचं सर्वात जलद अपडेट तुम्ही पाहू शकणार आहात.