रेल्वे प्रवाशांसाठी बॅड न्यूज
यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये कोणत्याही भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नव्हता.
नवी दिल्ली: यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये कोणत्याही भाडेवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नव्हता. पण अधिकच्या सुविधा देणाऱ्या नव्या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत.
रेल्वे मंत्रालयातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी रेल्वे नव्या सेवा सुरु करणार आहे, यासाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
हमसफर, तेज आणि उदय यासारख्या नव्या ट्रेननं प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 15 ते 30 टक्के जास्त पैसे द्यावे लागू शकतात. या ट्रेनची घोषणा 2016-17 च्या रेल्वे बजेटमध्ये करण्यात आली होती.