नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी बजेट सादर केलं. बजेटमध्ये केंद्र सरकारने लोकांना दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या. तर बजेटमध्ये पोस्ट ऑफीसमध्येच पासपोर्ट सुविधा उपलब्ध करणार असल्याचं देखील जाहीर केलं. यामुळे आता पासपोर्ट बनवण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे नाही लागणार.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही शहरांमधील मुख्य पोस्ट ऑफीसमध्ये पासपोर्टसाठी अर्ज करुन त्यानंतर त्यांना ते डिलीवर केले जातील. यासाठी परराष्ट्र मंत्रालयांने पासपोर्ट अॅक्टनुसार पोस्ट ऑफीसला अधिकार देणार आहे. यासाठी पोस्टाचे कर्मचाऱ्यांना खास ट्रेनिंग दिली जाणार आहे. सरकारची योजना पुढील काही महिन्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्याची आहे.


पोस्ट ऑफीसमध्येच आता पासपोर्टसाठी अर्ज करता येणार असल्याने सामान्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख म्हणून आज पासपोर्ट एक महत्त्वाचं ओळखपत्र आहे.