नवी दिल्ली : ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अनेकांनी मोठ्या प्रमाणात खात्यात पैसे जमा केले. ५०० आणि १००० च्या जुन्या नोटांनी अनेकांनी बिलं देखील भरली.


आयकर विभागाने देशभरात ८ नोव्हेंबर नंतर लोन फेडत असलेल्या लोकांनी जुन्या नोटांच्या मार्फत जमा केलेल्या पैशांचा खुलासा केला आहे. ८०,००० कोटी रुपये यावेळी लोनची रक्कम भरण्यासाठी वापरला गेला. आयकर विभागाचं म्हणणं आहे की, नोटबंदीनंतर ३ ते ४ लाख कोटी रुपये लपवून ठेवलेली रक्कम बँकेत जमा केली आहे.