जमावाच्या हल्ला टाळताना पीडीपीचे आमदार जखमी
पीडीपीचे आमदार मोहम्मद खलील बंध यांच्यावर जमावाने दगड फेक केली, जमावाला टाळून वेगाने पुढे जात असताना बंध यांची गाडी उलटली, त्यात ते गंभीर जखमी झाले . पीडीपीचे मोहम्मद खलील हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, ते श्रीनगरकडे जात होते, तेव्हा जमावाने त्यांच्या मोटारीवर दगडफेक केली.
श्रीनगर : पीडीपीचे आमदार मोहम्मद खलील बंध यांच्यावर जमावाने दगड फेक केली, जमावाला टाळून वेगाने पुढे जात असताना बंध यांची गाडी उलटली, त्यात ते गंभीर जखमी झाले . पीडीपीचे मोहम्मद खलील हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, ते श्रीनगरकडे जात होते, तेव्हा जमावाने त्यांच्या मोटारीवर दगडफेक केली.
चालकाने गाडी जोरात नेण्याच्या प्रयत्न केल्यानंतर ती खड्ड्यात पलटली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बंध यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती रुग्णालयात पोहचल्या.
हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान वणीच्या मृत्यूनंतर गेल्या अकरा दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहे. आतापर्यंत याठिकाणी झालेल्या चकमकीत चाळीस पेक्षा जास्तजणांचा मृत्यू झाला आहे. काश्मीर खोऱ्यात अद्याप संचारबंदी कायम आहे.