इटानगर : पेमा खांडू यांनी अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर चौना मेन यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 या शपथविधीला नकाम तुकी, खालिको पूल यांच्यासह काँग्रेसचे आमदार उपस्थित होते.


अरुणाचल प्रदेशात बहुमत सिद्ध करण्यासाठी काही तास शिल्लक असताना विद्यमान मुख्यमंत्री नाबाम तुकी यांनी अचानक राजीनामा दिला, तर त्यांच्या जागी नवे नेते म्हणून पेमा खांडू यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे राज्याचे नवे मुख्यमंत्री खांडू हेच असतील, हे जवळपास निश्‍चित झाले. 


सर्वोच्च न्यायालयाने बंडखोरांना दणका देतानाच अरुणाचल प्रदेशातील सरकार बरखास्त करण्यास विरोध केला होता. तसेच तुकी यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली होती. या सर्व घडामोडींनंतर केंद्रातील मोदी सरकारला दोषी ठरविण्यात आले होते. 


कॉंग्रेसने तर मोदी सरकारवर कडाडून हल्ला चढविला होता. शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत विद्यमान मुख्यमंत्री तुकी यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश राज्यपाल तथागत रॉय यांनी दिले होते. तुकी हे बहुमत सिद्ध करू शकतील की नाही, याची कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींना भीती वाटत होती. त्यामुळे काही तासातच नाट्यमयरीत्या घडामोडी घडल्या.