नोटांचं प्रमाण वाढल्याने डिजीटल व्यवहार घटले
नोटाबंदीनंतर अचानक वाढलेला डिजीटल व्यवहार चलनात नोटा वाढल्यानंतर पुन्हा कमी झाला आहे.
नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर अचानक वाढलेला डिजीटल व्यवहार चलनात नोटा वाढल्यानंतर पुन्हा कमी झाला आहे.
रिजर्व बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय अर्थव्यवस्थेत कागदी चलनांचं प्रमाण वाढल्यानंतर लोकांना पुन्हा रोख रकमांचा व्यवहारच सोईचा वाटु लागलाय.
या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी आठ नोव्हेंबरला नोटबंदी झाल्यानंतर क्रेडीटकार्ड, यूपीआय, यूएसएसडी आणि मोबाईल बँकींगद्वारे जवळपास ९,५७५ लाख व्यवहार करण्यात आले होते. ते आता १०४.०५ लाख करोड रुपयांचा होतोय.
हे व्यवहार जानेवारीत ८,७०४ लाखांवर तर फेब्रुवारीत ७,६३० लाखांवर आले होते. हीच आकडेवारी पाहता, महिन्यातील डिजीटल व्यवहारही मोठ्या प्रमाणावर बदलत असल्याचं दिसतंय.
लोकांनी हातात रोख रक्कम उपलब्ध नसताना मोबाईल बँकींग, इंटरनेट बँकींग आणि पॅन कार्ड व आधार कार्डच्या मदतीने परस्पर कॅशलेस व्यवहार करण्याचा पर्याय स्विकारला होता.
ही आकडेवारी पाहता मोदीजींचा कॅशलेस इंडीया, डिजीटल इंडीयाचा संकल्प काहीसा फसला असल्याचेच दिसतंय.