नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हात मिळवणी ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम यांना महागात पडली आहे. प्रिन्सच्या हात मिळवणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिपल्स डेली चायना @PDChinaने एक फोटो ट्विटवर अपलोट केलाय. तसेच ट्विट केलेय की, भारतीय पंतप्रधान मोदी यांचा शेकहॅंड ताकदवार आहे. राजकुमार यांचा हात पाहिला की ते लक्षात येते.


ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम आणि राजकुमारी कॅथरीन यांच्या सम्मानार्थ मोदींनी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये दुपारी भोजन दिले. यावेळी राजयकुमार आणि कॅथरीन यांच्यासोबत फोटोसेशन झाले. त्यावेळी हातमिळवणी झाली. त्यावेळी राजकुमार यांचा हात लालबुंद झाला.