नवी दिल्ली : गुडगावमध्ये एका आरटीआई कार्यकर्त्याने वॉट्सअॅप बंद करावं यासाठी याचिका दाखल केली आहे. सुधीर यादव यांनी  सुप्रीम कोर्ट वॉट्सअॅपसह टेलीग्राम आणि इतर मॅसेंजरही बंद करावे अशी याचिका दाखल केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉट्सअॅपकडे एंड टू एंड इन्क्रिप्शन आहे जो भारत सरकारला या मॅसेजेस अॅक्सेस करण्याची परवानगी देत नाही. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वॉट्सअॅप देशात बंद करावं अशी याचिका यांनी केली आहे.


वॉट्सअॅपवर पाठवलेला मॅसेज आपण ज्याला पाठवतो तोच पाहू शकतो. या मॅसेजेसला सुरक्षित केलं गेलं आहे. पण जर काही आक्षेपार्ह असेल तर ते इतर कोणालाही दिसू शकत नाही. 


सुधीर यांनी अगोदर वॉट्सअॅपच्या इन्क्रिप्शन नियमांची माहिती आरटीआयच्या माध्यमातून मागितली पण याबाबत त्यांना कोणतीही माहिती न मिळाल्याने त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि वॉट्सअॅप बंद करण्याची याचिका दाखल केली.