नवी दिल्ली : वाहनधारकांसाठी गुडन्यूज आहे. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले असून नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.


पेट्रोल ३ रुपये ७७ पैसे तर डिझेल २ रुपये ९१ पैशांनी स्वस्त झाले आहे. हे नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाकडून सांगण्यात आले.