मुंबई : पाच वर्षांमध्ये पेट्रोलचे दर ३० रुपये प्रती लीटर होऊ शकतात. जर नवं तंत्रज्ञान येत राहिलं तर त्याच्या मदतीने जगभरात पेट्रोलचे दर कमी होऊ शकतात. अमेरिकेचे सिलिकन वॅलीचे सीरियल एन्टरप्रेन्यर टोनी सेबा यांनी याबाबत भाकीत केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोनी सेबा यांनी काही वर्षांपूर्वी भाकीत केलं होतं की भविष्यात सोलार पावरचे रेट कमी होतील आणि आज जवळपास ती १० पट्टीने कमी झाली आहे. सेबा स्टॅनफोर्ड कन्टीन्यूइंग स्टडीज प्रोग्रामचे एन्टरप्रेन्योरशिप, डिसरप्शन आणि क्लीन इनर्जी प्रोग्रामचे ते इंस्ट्रक्टर देखील आहेत.


सेबा यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, सेल्फ ड्राइविंग कार आल्यानंतर इंधनची जास्त गरज लागणार नाही. त्यामुळे पेट्रोल, डिझेल यांच्या किंमती प्रती बॅरल 25 डॉलरपर्यंत कमी होऊ शकतात. सेबा यांच्यानुसार 2020-21 पर्यंत पेट्रोलची मागणी राहिल. त्यानंतर मागणी कमी कमी होत जाईल. पुढच्या १० वर्षात मागणी 100 मिलियन बॅरलवरुन घटून 70 मिलियन बॅरल होईल.


सेबा म्हणतात की, लोकं जुन्या गाड्या चालवणं सोडणार नाहीत पण नव्या सेल्फ ड्राइविंग इलेक्ट्रिक गाड्या रस्त्यांवर अधिक दिसतील. इलेक्ट्रिक वेहिकल स्वस्त होतील आणि त्याचा खर्च देखील कमी असेल. एका रिपोर्टनुसार काही दिवसांपूर्वा भारताते ऊर्जा मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं होतं की, भारतात  2030 पर्यंत सर्व इलेक्ट्रीक गाड्या असतील.