`पीएफ`वर आता 8.8 टक्के व्याज
`पीएफ`वर आता 8.8 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2015-16 साठी पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : 'पीएफ'वर आता 8.8 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2015-16 साठी पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
आता 2015-16 या वर्षासाठी 8.8 टक्के दराने व्याज आकारण्यात येणार आहे. यापूर्वीही कामगार संघटनांच्या विरोधामुळे सरकारला 'पीएफ' संदर्भातील निर्णय मागे घ्यावे लागले आहेत. त्यामध्ये 'पीएफ'ची रक्कम काढण्यासंबंधीच्या नियमांचा नियमाचा समावेश होता.
'पीएफ'वर 2015-16 या वर्षासाठीचा व्याजदर 8.8 टक्के द्यावा, अशी शिफारस केंद्रीय विश्वस्त मंडळ आणि केंद्रीय कामगार मंत्रालयाने केली होती.
परंतु निधीअभावी केवळ 8.7 टक्के दराने व्याज देणे शक्य असल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले होते. त्यावर कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध केला. हा निर्णय कर्मचाऱ्यांच्याविरुद्ध विरोधी असल्याची टीका केली होती. त्यामुळे या निर्णयात बदल करण्यात आला आहे.