नवी दिल्ली : अमेरिकेची वैद्यकीय उत्पादन करणारी कंपनी 'प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल्स'नं (पी अॅन्ड जी) भारतातील आपलं लोकप्रिय उत्पादन 'व्हिक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा'चं उत्पादन आणि विक्री थांबवलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी अधिकृतरित्या कंपनीनं हा निर्णय जाहीर केलाय. सरकारने या उत्पादनावर घातलेल्या बंदीवर आता कंपनीनं ही अधिकृत घोषणा केलीय.


'विक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा' ही गोळी सर्दी, पडसं आणि डोकेदुखीवर झटपट उपाय म्हणून लोकप्रिय आहे. पण, सरकारने 'फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन' म्हणजेच एका उत्पादनात दोन ड्रग्ज असणाऱ्या उत्पादनांवर बंदी घातली आहे. आरोग्याला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आली आहे. म्हणूनच कंपनीनेही या गोळीचे उत्पादन आणि विक्री तातडीनं थांबवलीय.


उल्लेखनीय म्हणजे, बाजारात उपलब्ध असलेल्या ३४४ उत्पादनांपैकी ही एक गोळी आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार मात्र हे उत्पादन, त्याचा दर्जा आणि त्याची सुरक्षा याची कंपनीला खात्री आहे. कंपनीच्या इतर कोणत्याही उत्पादनांवर मात्र बंदी घालण्यात आलेली नाही.