दिसपूर : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे पहिल्यांदा मोदींविषयी बोलले आहेत, मनमोहन सिंह म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करू इच्छित नाही. परंतु, ते खरं बोलत नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असा भीम टोला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज आसामच्या दिसपूरमध्ये लगावला. डॉ. मनमोहनसिंग विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.


मनमोहन म्हणाले, मी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करू इच्छित नाही. परंतु, त्यांनाही माहित आहे की ते खरं बोलत नाहीत. आसाममध्ये पक्षाने मागील १५ वर्षांत केलेल्या चांगल्या कामांमुळे काँग्रेसचेच सरकार येणार आहे. शिवाय, दुसऱ्या टप्प्यात सुरू असलेले मतदान निर्णायक ठरणार आहे.'