नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील भाजप खासदारांना केवळ दोनच प्रश्न विचारले. मात्र, त्यांच्याकडे उत्तर नसल्याने त्यांना तरदरुन घाम फुटला आणि त्यांनी माना खाली घातल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहे. त्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी पुढील रणनीती आखण्यसाठी भारतीय जनता पक्षाची संसदीय मंडळाची बैठक मोदी यांच्या उपस्थित घेण्यात आली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष अमित शाहही उपस्थित होते. मोदी यांनी ७१ खासदारांना दोनच प्रश्न केले. मात्र, सर्वांनी मोदींच्या प्रश्नावर मौन पाळले.


संसदीय क्षेत्रातील खासदारांना मोदींनी प्रश्न केले. यात दीनदयाल ज्योतिग्राम योजना याच्यामाध्यमातून किती गावांत विजपुरवठा करण्यात आलाय. त्यानंतर मोदींनी विचारले, किती खासदारांनी पीएमओ अॅप डाऊनलोड केले आहे. या दोन्ही प्रश्नांवर कोणत्याही खासदाराला उत्तर देता आले नाही.


या बैठकीत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. यावेळी सरकारचे काम जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. आपल्याकडे जास्त वेळ नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी जातीने लक्ष द्यावे, असे अमित शाह आणि गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले. तर संसदीय कार्यमंत्री वैंकय्या नायडू यांनी सांगितले की, जेएनयू आणि रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण सरकार आणि पक्षाचा दृष्टीकोण घेऊन जनतेमध्ये जाऊ.