नवी दिल्ली :  मोदींच्या मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्याने नव्याने १९ मंत्री दाखल झाले ही बातमी दाबली गेली. 


कोणते दोन मंत्रालय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या मंत्रालयावर नाराज होते, त्याची संपूर्ण टीम रद्द करण्यात आली. यात मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि ग्राम विकास मंत्रालय याचे जिवंत उदाहरण आहे. 


कोणाचे विभाग बदलले


नाराजीमुळे मोदींनी स्मृती इराणी आणि चौधरी बीरेंद्र सिंह याचे विभाग बदलले. तसेच जुनिअर मंत्री रामशंकर कठेरिया आणि निहाल चंद यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला. 


कोणाचा पत्त कट झाला असता...


एचआरडी मंत्रालयातील ज्युनिअर मंत्री उपेंद्र कुशवाह यांचा पत्ता कट होता होता राहिला. तसेच चांगली कामगिरी न करणाऱ्या सदानंद गौडा यांना कमी महत्त्वाचे सांख्यिकी आणि योजना अमंलबजावणी मंत्रालय देण्यात आले. 


आजारी मंत्र्यांनाचा भार कमी


तसेच मोदींनी आपल्या सिनिअर मंत्र्यांच्या आरोग्यसह कामगिरीवरही लक्ष ठेवले. त्यानुसार अर्थमंत्री अरूण जेटली आजारी असल्याने त्यांच्याकडील सूचना आणि प्रसारण मंत्रालयाचा पदभार काढून घेतला. तर ही जबाबदारी चांगली कामगिरी करणाऱ्या वैंकय्या नायडू यांच्यावर सोपविण्यात आली. 


कशामुळे मोदी नाराज


मोदींनी फेरबदल करताना निवडणुका असलेल्या राज्यांचाही विचार केला आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयातील दोन्ही वादग्रस्त मंत्र्यांना आणि ग्राम विकास मंत्रालयाच्या सुस्त कामकाजामुळे पंतप्रधान खूप नाराज होते. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण ज्यापद्धतीने हाताळले त्यामुळे मोदी खूप नाराज होते. 


तसेच चौधरी बिरेंद्र सिंह पंतप्रधानांच्या गाव सक्षमीकरणाचा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्यात अपयशी राहिल्याचे बोलले जात आहे.